जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया

 

मनसे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ शृंगारतळी येथील सभेत राज ठाकरे यांचे आवाहन

गुहागर प्रतिनिधी

आजपर्यंत आपण चुकीची माणसे आजपर्यंत निवडून दिलीत.तुम्ही वारंवार चुकीच्या माणसाना निवडून देत आहात.ज्यांच्याकडे या कोकणचा विकास करण्याची इच्छाशक्तीच नाही.त्याच त्याच माणसाला मतदान करून तुमच्या हाती काहीच लागणार नाही.विकास काय असतो,डेव्हलपमेंट काय असते हे एकदा माझ्या हाती सत्ता द्या आणि पहा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपण घडवूया असे आवाहन येथील उपस्थित जनसमुदायाला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले. मनसे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ शृंगारतळी येथील सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले,कोकणला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.पण येथील पर्यटनदृष्टया विकास झाला का नाही?पर्यटनातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो पण तुम्ही चुकीची माणसे निवडून दिलीत आज अनेक तरुण तरुणी मुंबईत निघुन जात आहेत.प्रत्येक जण आता येऊन सांगेल मी रोजगार आणेन!पण तुम्ही कधीच प्रश्न विचारत नाही आजपर्यंत येथील तरुण-तरुणी शहराकडे मग का जातात?काहीही न करता तुम्ही सतत मतदान करत असाल तर विकास कशाला होईल असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.याठिकाणी जर बदल हवा असेल तर तुम्ही निवडून दिलेल्या माणसांमध्ये ती इच्छाशक्ती असली पाहिजे.त्याच त्याच माणसाला मतदान करून तुमच्या हाती काहीच लागणार नाही.सत्तेच्या बाहेर असताना जर आपण एवढं काही करू शकतो तर एकदा सत्ता माझ्या हाती द्या.मग बदल बघा असे आवाहन करतानाच माझ्या येथील तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि विकास काय असतो ते पहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.