वेंगुर्ला l प्रतिनिधी :वेंगुर्लेचे सुपुत्र,मुंबई हायकोर्टचे सुप्रसिद्ध वकील तसेच दशावतार लोककलेवर पहिले संशोधन करत मुंबई विद्यापीठाची दशावतारात पहिली डॉक्टरेट पदवी संपादन करणारे अँड. डॉ. अशोक भाईडकर यांच्या सर्जनशीलतेतुन साकारलेल्या स्पर्श या कादंबरीला अनुजा सेवा संस्था आणि ए ए एन के वाचनालय यांच्या संयुक्त माध्यमातून दिला जाणारा २०२४ चा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार जाहिर झाला असुन लवकर या बद्दल डॉ.अशोक भाईडकर गौरविण्यात येणार आहे.
स्पर्श या कादंबरीचे प्रकाशन भारतातील पहिल्या दशावतारी संमेलनात वेंगुर्ला येथे करण्यात आले होते.
स्पर्श या कादंबरीत मानवी शृंगाराच्या विविध गोष्टींचा सुंदर चित्रण केलेले असून कौमार्य या विषयावर या कादंबरीत भाष्य केलेले आहे तरुण-तरुणी, पती-पत्नी त्यांच्या मनामध्ये चाललेल्या विविध प्रकारच्या भावनांचं वर्णन करताना ही कादंबरी वाचकांना एका वेगळ्या वळणावर घेऊन जाते. अशा या कादंबरीला राज्यस्तरीय गौरव मिळणं ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे
डॉक्टर अशोक भाईडकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्याचा वाचक वर्ग सुध्दा मोठा आहे.
इंग्रजी साहित्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे अशा या कोकणच्या सुपुत्राला मिळालेला गौरव हा सिंधुदुर्गासाठी गौरास्पद गोष्ट आहे यामुळे सर्व स्तरातून अशोक भाईकर यांच्या वर अभिनंदन चा वर्षाव होत असुन
डॉ अशोक भाईडकर
यांच्या स्पर्श कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांनी ही विशेष अभिनंदन केले आहे.












