वेंगुर्ले l दाजी नाईक :कोल्हापूरच्या श्री.महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे किरणोत्सव सोहळा होतो त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा अनेक भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. हा सोहळा भाविकांना तीन दिवस अनुभवता येत आहे.
वेंगुर्ला येथील सातेरी मंदिर हे पांडवकालीन मंदिर असल्याचे बोलले जाते वास्तुशास्त्राचा एक अद्भुत नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. दरवर्षी वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा अनेक भाविकांना अनुभवता येतो. ठरलेल्या दिवशी सूर्योदयानंतर काही वेळातच सूर्याची किरणे ही मंदिरावर पडतात आणि यातील एक किरण वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मखरावर पडते आणि हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भाविक भक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्हा बाहेरून ही येतात. किरणोत्सव सोहळ्यानंतर महाआरतीने हा सोहळा संपन्न होतो. काल पासून हा सोहळा सुरू झाला. आज हा किरणोत्सव सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहिला. उद्या ५ मार्च रोजी ही हा किरणोत्सव सोहळा अनुभवता येणार आहे.












