मंडणगड | प्रतिनिधी : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड, मध्ये आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी दीप प्रज्वलन करून ,राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर यांनी अगरबत्ती प्रज्वलित करून पुष्प अर्पण केली .
यानंतर कुमारी स्नेहल गीते इयत्ता पाचवी व रोहिणी पाटील इयत्ता सहावी यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचे मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील शिक्षक श्री .किशोर कासारे यांनी राजश्री शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे श्री. शैलेश खताते यांनी केले. या कार्यक्रमाला सौ. शकुंतला वाघमारे, सौ. ज्योती राणे, श्री .नरेश माटवणकर, श्री. प्रकाश हेलोंडे हेही उपस्थित होते .
अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.












