‘कोकण पदवीधर’साठी ५९. ३१ टक्के मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वाधिक ७३. ६२ टक्के मतांचे योगदान

रत्नागिरी : सिंधदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ७३. ६२ टक्के मतदानासह कोकण पदवीधर मतदार संघात एकूण सरासरी ५९. ३१ टक्के मतदान झाले आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या विस्तीर्ण कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणूक नेहमीच आव्हानात्मक असते. मतदारांची संख्या अन्य निवडणुकीच्या तुलनेने कमी असली तरीही ती विस्तारलेल्या भूप्रदेशात असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे नेहमीच कठीण असते. मात्र हे शिवधनुष्य पेलत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील शिवसेनेसह घटक पक्षांनी हे शिवधनुष्य पेलत जोरदार प्रचार करत निरंजन डावखरे यांना तिसऱ्यांदा आमदार बनवत भाजपाचा आमदार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. नियोजनबद्ध प्रचाराची चुणूक यावेळी दिसून आली. तर महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसला देण्यात आली होती. रत्नागिरी एजुकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर हे महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. या शिवाय अपक्ष उमेदवारही रिंगणात होते.

सकाळी सुरु झालेल्या मतदानामध्ये सुरुवातीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाचा जोर होता. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७३. ६२ टक्के इतके मतदान झाले. त्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्यात ६३. ३५ टक्के, रायगडमध्ये ६१. ९८ टक्के, ठाणे येथे ५४. २८ टक्के तर पालघर मध्ये ५९. १७ टक्के इतके मतदान झाले आहे. एकूण मतदान ५९. ३१ टक्के इतके झाले आहे.

तर याच निवडणूक प्रक्रियेतील मुंबई पदवीधर मतदार संघासाठी ५२. १८ % तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी ७३.३६ % मतदान पार पडले आहे.