अर्थसंकल्पात वेंगुर्ले तालुक्यातील ७ कोटी रुपयांच्या चार कामांना मंजुरी…

मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री यांचे आभार : सचिन वालावलकर

वेंगुर्ले : दाजी नाईक
आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २५ कोटी रुपये निधीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील ७ कोटी रुपयांच्या चार कामांना मजुरी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही आम. केसरकर यांच्या सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे शिवसेनेच्या वतीने आभार मानत असल्याचे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वेंगुर्ले शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन वालावलकर यांच्या सह महिला तालुकाप्रमुख शितल साळगावकर, नगरसेविका लीना म्हापणकर, टिना आल्मेडा, सत्यवान साटेलकर आदी उपस्थित होते. आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यात विविध प्रकल्प आणि विकासात्मक कामे मार्गी लागणार आहेत. आमदार केसरकर यांच्या माध्यमातून राज्याचे बांधकाम मंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कामांना मंजुरी मिळाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील गेले काही दिवसांपासून मागणी होत असलेल्या खालील कामांना मंजुरी मिळाल्याने आता ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत असे श्री. वालावलकर यांनी सांगितले. या मंजूर कामांमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील बुर्डी ठाणे न्हावा शेवा विजयदुर्ग मालवण वेंगुर्ला शिरोडा सातार्डा प्ररामा ४ किमी ७६२/०० ते ७७६/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (भाग टाक ते सागरतीर्थ) या कामासाठी ३ कोटी रुपये, वेंगुर्ला तुळस सावंतवाडी रस्ता रा. मा. १८४ किमी ६/०० ते २१/१०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे व किमी ७/८२० मध्ये क्षतिग्रस्त मोरीची पुनर्बाधणी व संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी रुपये, शिरोडा ते रेडी तेरेखोल प्रजिमा ६४ किमी ०/०० ते ५/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामासाठी १ कोटी रुपये आणि मालवण वेंगुर्ला शिरोडा सातार्डा प्ररामा ४ किमी ७४५/०० ते ७६०/०० मध्ये सुधारण व डांबरीकरण करणे (भाग म्हापण ते दाभोली) या कामासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.