भविष्यातील संधी ओळखून शिक्षण घ्या! सरपंच प्रकाश तोंडवळकर यांचे प्रतिपादन

हडी ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंताचा सत्कार

मसुरे | झुंजार पेडणेकर : मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुलांनी आवश्यकतेनुसार मोबाईलचा वापर करावा. शिक्षण घेताना आपली आवड व उपलब्ध संधी यांचा विचार करून करियर घडवावे असे प्रतिपादन हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी येथे केले. हडी ग्रामपंचायतच्या वतीने इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गावातील विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला.

 

यावेळी ते बोलत होते. पुढील शिक्षण घेताना भविष्यात येणाऱ्या अडचणींना बाजुला सारून करिअर यशस्वी करा असे ग्रामसेवक एस एस चौरे म्हणाले. मान्यवर तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच भरत लाड, ग्राप.सदस्य आनंद रावले,भावेश सुर्वे,प्रज्ञा सूर्वे,प्राची मयेकर, सुहासिनी वाळवे, दीक्षा गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी अजित मुळीक, हर्षदा मांजरेकर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.