स्थानिक युवकांनी चालक व कार बाहेर काढली
तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली
बांदा l प्रवीण परब : बांदा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असून आळवाडी बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. व्यापारी व नागरिकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात सुरुवात केली आहे. आळवाडा येथे पुराच्या पाण्यातून अल्टो कार नेण्याचा चालकाचा प्रयत्न फसला व कारमध्ये पुराच्या पाण्यात अडकून राहिला. स्थानिक युवकांनी तातडीने धाव घेत चालकाला बाहेर काढले. तसेच कारही पाण्यातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी नेली. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही पाण्याची पातळी मात्र कायम आहे.











