शहरातील सय्यद चांदशहा बुखारी दर्गा लांजा येथे पार पडली इफ्तार पार्टी

Google search engine
Google search engine

Iftar party was held at Syed Chandshah Bukhari Dargah Lanja in the city

मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि लांजा पोलीस ठाणे यांचे आयोजन

लांजा | प्रतिनिधी : इफ्तार पार्टीचे आयोजन करून शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांचा सलोखा कायम राखण्याचे काम केले गेले असल्याचे गौरवोद्गार लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजा येथे केले.मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा आणि पोलीस ठाणे लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा शहरातील सय्यद चांदशहा बुखारी दर्गा या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लांजा तहसीलदार प्रमोद कदम हे बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार प्रमोद कदम यांच्यासह पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे तसेच उपनिरीक्षक प्रशांत जाधव, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, जमातून मुस्लिम लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक, लांजा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष परवेश घारे, माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष रमजान गोलंदाज, गावचे मानकरी श्री सुधाकर उर्फ नाना शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांसह अन्य उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिवसेना माजी शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड तालुका अध्यक्ष अल्लाउद्दीन नेवरेकर, कुरर्धुंडा सरपंच जमुरत अल्जी,काँग्रेस व भीमशक्ती कोकण प्रदेश अध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे, उपसरपंच तैमूर अलजी , नितीन शेट्ये, हनिफ नाईक,संतोष जाधव , बौद्ध समाज अध्यक्ष श्री कांबळे ,शिवसेना शहर प्रमुख नागेश कुरूप, मुस्लिम वेलफेयर कार्याध्यक्ष अकील नाईक,युवा अध्यक्ष अकिब मुजावर खजिनदार सईद खान , नदीम नाईक, फारूक मोटलांनी, अस्लम इसफ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरबाज नेवरेकर यांनी केले.