विविध कलाविष्काराने रत्नागिरीत साजरा झाला रंगभूमी दिन

Google search engine
Google search engine

Theater Day was celebrated in Ratnagiri with various arts

रत्नागिरी : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने स्वा.सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ रंगकर्मी श्री.सुधाकर बेहेरे, श्री.सुहास भोळे, श्री.सुहास साळवी, श्री.मनोहर जोशी, विनयराज उपरकर, विनोद अण्णा वायंगणकर, नितीन जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नटराजाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम राकेश बेर्डे यांच्या गणेश वंदनेने झाली,आणि मग किरण डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यान्नी सोलो आणि ग्रुप डान्स करून रंगत वाढविली. यासीन नेवरेकर यांनी देखील गाण्यांच्या माध्यमातून रंग भरले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य नाट्य स्पर्धामधून यश प्राप्त केलेल्या रत्नागिरीतील रंगकर्मींनचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सांघिक विजेते
टीम निर्वासित विजेते प्राथमिक फेरी गद्य नाटक विभाग
टीम गोगटे जोगळेकर महाविद्यालय विजेते पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा
परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे – विजेते संगीत नाट्यस्पर्धा
कालारंग नाट्य प्रतिष्ठान वरवडे खंडाळा -उपविजेते संगीत नाट्य स्पर्धा.
टीम देसाई हायस्कुल रत्नागिरी – विजेते बालनाट्य स्पर्धा

वैयक्तिक बक्षीसपात्र कलाकार
दिग्दर्शन प्रथम स्वप्नील जाधव – नाटक निर्वासित
प्रकाश योजना प्रथम – श्याम चव्हाण – निर्वासित
नैपथ्य द्वितीय – सचिन गावकर
सर्वोत्कृष्ट अभिनय रौप्य पदक – श्री.प्रफुल्ल घाग.
अभिनयासाठी प्रमाणपत्र- दीपक माणगावकर – नाटक “मड वोक”
संगीत नाटक स्पर्धा
दिग्दर्शन प्रथम -घनश्याम जोशी नाटक “संगीत मंदारमाला”
दिग्दर्शन द्वितीय – नितीन जोशी नाटक “संगीत मल्लिका”
नाट्यलेखन प्रथम – अमेय धोपटकर नाटक “संगीत मल्लिका”
संगीत दिग्दर्शन प्रथम – विजय रानडे नाटक संगीत मल्लिका
नैपथ्य प्रथम – पायल लोगडे नाटक संगीत मंदारमाला
संगीत साथ ऑर्गन प्रथम – हर्षल काटदरे नाटक “संगीत मंदारमाला”
संगीत साथ तबला प्रथम – प्रथमेश शहाणे. नाटक “संगीत मंदारमाला”
गायन रौप्यपदक पुरुष – विशारद गुरव नाटक “संगीत मंदारमाला”
गायन रौप्यपदक स्त्री. – जान्हवी खडपकर नाटक संगीत मल्लिका
अभिनयासाठी प्रमाणपत्र स्त्री – करुणा पटवर्धन नाटक “सं कट्यार काळजात घुसली”
अभिनयासाठी प्रमाणपत्र – सौम्या आठल्ये नाटक “संगीत मल्लिका”
अभिनयासाठी प्रमाणपत्र – स्वानंद देसाई नाटक “संगीत कट्यार काळजात घुसली”
गायनासाठी गुणवता प्रमाणपत्र – तन्वी मोरे नाटक “संगीत मल्लिका”
गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र देवश्री शहाणे नाटक “संगीत मंदारमाला”
गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र कैलास साठे नाटक “संगीत कट्यार काळजात घुसली”
बालनाट्य स्पर्धा
दिगर्शन – संतोष गार्डी नाटक “राखेतून उडाला मोर”
प्रकाश योजना प्रथम – साईप्रसाद शिरसेकर नाटक “राखेतून उडाला मोर”
नैपथ्य द्वितीय – प्रवीण धूमक नाटक “राखेतून उडाला मोर”
पार्श्वसंगीत प्रथम – निखिल भुते नाटक राखेतून उडाला मोर
संस्कृत नाट्यस्पर्धा नाट्यलेखन प्रथम – कु ईशा केळकर नाटक “यावद चंद्र दिवाकरो”
अभिनय रौप्य स्त्री. – संचिता जोशी नाटक “अज्वलीस्त: चंद्रा”

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा”
टीम गोगटे जोगळेकर महाविद्यालय सांघिक तृतीय पारितोषिक विजेती एकांकिका
दिग्दर्शन :- गणेश राऊत,उत्कृष्ट अभिनय :- शुभम गोविलकर
या सोबत दापोली मधील बक्षीस विजेत्या रंगकर्मींनचा देखील आवर्जून उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमात यानंतर नाट्यपरिषदेच्या नव्या प्रघातानुसार ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर बेहेरे यांचा सत्कार आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे केंद्र निदेशक श्रीनिवास जरंडीकर, विनयराज उपरकर,सतिश दळी, डॉ.आनंद आंबेकर आणि संजय बोरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना अतिशय भारावल्या मनस्थितीत, श्री.बेहेरे यांनी त्यांचा प्रवास उलगडून सांगितला आणि आपल्या कार्याची नोंद घेत केलेल्या सन्मानाबाबत नाट्यपरषदेबाबत कृतज्ञताही व्यक्त केली.

कार्यक्रमात कु. सुमुख काळे याने सांगितलेल्या कथेने जान आणली, तर कु.कवीतके या छोट्याश्या गायिकेने देखील गीत सादर केले. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते मात्र संगीत सह्याद्री ग्रुप लांजा यांचे साईबाबा. खुद्द साईबाबाच अवतारल्यावर नाट्यगृहाचा परिसरच भक्तिमय होऊन गेला. आणि उत्तरोत्तर रंगात गेलेला हा कार्यक्रम उत्तम रीतीने संपन्न झाला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाट्य परिषदेच्या सतीश दळी, प्रफुल्ल घाग, अनिल दांडेकर, शाम मगदूम, सुनील बेंडखळे, सनातन रेडीज, वामन कदम, अनिकेत गानू, अमेय धोपटकर, डॉ. आनंद आंबेकर, मनोहर जोशी, यांनी विशेष मेहनत घेतली.