राणे साहेबांची शिकवण ; देऊ तो शब्द पुरा करू!

 

धुरीवाडा येथील जोगी कुटुंबियांच्या घरावर असलेले तीन धोकादायक माड तोडले

माजी नगरसेवक दीपक पाटकर व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या पुढाकारातून सेवाकार्य

अमित खोत | मालवण : धुरीवाडा येथील जोगी कुटुंबियांच्या घरावर असलेले तीन धोकादायक माड (नारळ झाड) भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून तोडून देत जोगी कुटुंबियांना दिलासा देण्यात आला आहे.

याबाबत किरण जोगी, नीता जोगी, जिया जोगी, कुणाल मुंबरकर, लहू जोगी कुटुंबियांनी दीपक पाटकर यांसह भाजपा पदाधिकारी महेश सारंग, वसंत गांवकर, ललित चव्हाण, कृष्णा आडीवरेकर, राजु बिडये, आबा शिर्सेकर यांचे आभार मानले.

दीपक पाटकर म्हणाले, आम्ही मोठे काही केले नाही. खासदार राणे साहेबांची आम्हाला शिकवणच आहे. जनतेच्या समस्यां प्राधान्याने सुटल्या पाहिजेत. त्या प्रमाणे काम करत असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे सहकार्य आम्हाला जनसेवा कार्यात नेहमीच मिळते.

धुरीवाडा येथील जोगी कुटुंबीय यांच्या घरावर धोकदायक स्थितीत तीन माड होते. वाऱ्या पावसात हे माड कोसळण्याची भिती होती. याबाबत दीपक पाटकर यांना काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी माहिती देत काही करता येईल का विचारले. त्यावर दीपक पाटकर यांनी त्या कुटुंबियांना शब्द देत धोकादायक माड तोडून देण्याबाबत शब्द दिला. त्यानुसार दीपक पाटकर, महेश सारंग, वसंत गांवकर, ललित चव्हाण, कृष्णा आडीवरेकर, राजु बिडये, आबा शिर्सेकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत माड तोडून देत जोगी कुटुंबियांना दिलासा दिला आहे. याबाबत कुटुंबियांनी भाजपा पदाधिकारी यांचे आभार मानले.