रत्नागिरी : थोर समाजसुधारक, भंडारी समाजाचे मानबिंदू , डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरू स्थानी असलेले , ब्रिटिश असेम्ब्ली मध्ये कोकण रेल्वे , सर्व धर्मियांना सरकारी पाणवठे खुले करण्याचे , सतीची चाल रद्द करणारे, कुळ कायदा संमत करण्याचे लोकहितवादी प्रस्ताव आणणारे , १८९० मध्ये कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी संस्थेची स्थापना करणारे रावबहाद्दुर सी के बोले यांच्या १५५ व्या जयंती निमित्त कित्ते भंडारी हॉल रत्नागिरी येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, उपाध्यक्षा ॲड सौ प्रज्ञा तिवरेकर, सदस्य नितीन तळेकर , दिलीप भाटकर, आदेश भाटकर उपस्थित होते.









