दापोली | प्रतिनिधी: कृषि महाविद्यालय, दापोलीच्या स्थापनेला 59 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या परिषद दालनामध्ये 59 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजय भावे, माजी संचालक, विस्तार शिक्षण व माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, विद्यापीठाच्या नियंत्रक श्रीमती अपर्णा जोईस, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. रमेश कुणकेरकर उपस्थित होते.
या सोहळ्यात गेल्या 59 वर्षातील महाविद्यालयाच्या वाटचालीतील गत स्मृतिना उजाळा देण्यासाठी डॉ. प्रमोद सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास गोष्टी स्वरूपात सर्वासमोर मांडला. विद्यार्थ्यांच्या सहशैक्षणिक उपक्रमातील योगदानाबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीत आतापर्यंत ज्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी योगदान दिले त्यांचे स्मरण करून सर्वाना धन्यवाद दिले आणि सर्वाना पुढील वाटचालीत संपूर्ण योगदान द्यावे आणि सहकार्य करावे असे आवाहन केले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी कृषी महाविद्यालयाच्या 2023-24 मधील विविध उपक्रमांचा आढावा सांगून पुढील वर्षी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी यांना निमंत्रित करून भव्य कार्यक्रम करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि कै. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वागत डॉ. प्रवीण झगडे आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण प्रभारी डॉ. मकरंद करमरकर यांनी केले. सहाय्यक नियंत्रक श्री. अजित जाधव यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण झगडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे औचीत्याने कृषी महाविद्यालयाच्या झेंड्याचे ध्वजारोहण आणि 2023-24 मधील विविध शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार उपक्रमांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करून मागोवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचे उद्घाटन मा. कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्याहस्ते करण्यात आला. मागोवा करिता कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी व प्राध्यापक डॉ. संतोष सावर्डेकर यांचे 52व्या संयुक्त संशोधन व विकास समिती बैठकीमध्ये उत्कृष्ठ संशोधक 2024चा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कृषी महाविद्यालय मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, मुख्य समुपदेशक डॉ. जीवन कदम, वसतिगृह प्रमुख डॉ. विजय मोरे, शिक्षण प्रभारी डॉ. मकरंद करमरकर, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण झगडे सहाय्यक कुलसचिव श्री. गुजर, सहाय्यक नियंत्रक श्री अजित जाधव तसेच सहयोगी अधिष्ठाता कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विस्तार शिक्षण विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष वरवडेकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. मंदार पुरी व कर्म








