सेवानिवृत्तीच्या पाश्वभूमीवर सर्वच स्तरांतून शुभेच्छा
सावंतवाडी । प्रतिनिधी : शिक्षक नेते व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी च्या वतीने आयोजीत कार्यक्रमात म ल देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, देसाई सरांच्या पहिलीच्या शिक्षिका पाटकर मॅडम, राज्य कोषाध्यक्ष श्रीम. विनयश्री पेडणेकर, शिक्षक नेते सावळाराम अनावकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री.के. टी चव्हाण, माजी गटशिक्षणाधिकारी एम.पी मेस्त्री, माजी गटशिक्षणाधिकारी श्रीम.शुभांगी देशपांडे, राज्य संघटक श्री.प्रशांत पारकर, जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, जिल्हा सचिव बाबाजी झेंडे, महिला सेल जिल्हाध्यक्ष श्रीम संजना ठाकूर, केंद्रप्रमुख धोंडू रेडकर, दिनकर तळवणेकर, नरेंद्र सावंत, गुंडू सावंत, संदीप गवस, रामा गावडे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष व त्यांचे सहकारी, तालुकाध्यक्ष श्री.संजय शेडगे, जिल्ह्यातील तमाम प्राथमिक,माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नवनियुक्त शिक्षक तसेच मोठ्या संख्यने जिल्ह्यातील म.ल प्रेमी शिक्षक बांधव उपस्थित होते.











