सिंधुदूर्ग : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि सिंधु संकल्प अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यामध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर “सारथी” संगणक शिकता शिकता कमवा उपक्रमामध्ये येथील माया एंटरप्रायसेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमामध्ये १५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर विद्यार्थ्यांनी सारथी योजने अंतर्गत इंग्लिश कम्युनिकेशन, ऍडव्हान्स आयटी, डेटा-एन्ट्री, वेबडिसायनिंग, टॅली, BFSI, कॉम्पुटर हार्डवेअर नेटवर्क या कोर्सेस मध्ये शिक्षण घेतले होते व नोकरीमध्ये यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्तुंग भरारी बद्दल माया एंटरप्रायसेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.












