देवगड – वेडसर स्थितीतच दहा दिवसापुर्वी घरातुन बेपत्ता झालेल्या खुडीपाट येथील शोभा धाकू जोईल(८०) वृध्देचा मृतदेह २९ जुन रोजी सांकाळी ६.३० वा.सुमारास कुजलेल्या स्थितीत हसनवाडी ओहोळात सापडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खुडीपाट येथील शोभा धाकू जोईल या गेल्या आठ वर्षापासुन वेडसर स्थितीत होत्या.त्या मानसिक आजारी असल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.त्या घरातून अधुनमधून आठ-आठ दिवस वेडसर स्थितीत असल्याने जात परंतू त्या घरी परत येत होत्या.दि. १७ जुन रोजी त्या घरातून निघून गेल्या.त्यांची शोधाशोध करूनही त्या मिळाल्या नाहीत.शुक्रवार दि. २९ जुन रोजी सांकाळी ६.३० वा.सुमारास त्यांचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह तेथिलच हसनवाडी ओहोळात मिळाला.
याबाबतची खबर त्यांचा मुलगा संज धाकू जोईल यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.











