राजापूर नगर वाचनालयाच्या वार्षिक सभेत नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

 

अध्यक्षपदी प्रभात पाध्ये तर कार्यवाहपदी जयंत अभ्यंकर

तालुक्यातील सर्व सभासदांना संचालक होण्यासाठीचा महत्वपुर्ण ठराव पारित

राजापूर (वार्ताहर): दिडशे वर्षांहुन अधिक काळाची समृध्द परंपरा असलेल्या नगर वाचनालय राजापूर या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण राजापूर तालुका असल्याने तालुक्यातील विविध भागातील सभासदांना संचालक राहता येईल तसा बदल संस्थेच्या घटनेत करण्यात यावा असा महत्वपुर्ण ठराव रविवारी पार पडलेल्या नगर वाचनालय राजापूर वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. तर सन २०२५-२९ या पाच वर्षाकरिता नूतन कार्यकारी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक सदस्य संख्या सात वरून नऊ करण्याच निर्णयही या सभेत घेण्यात आला. दरम्यान नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रभात पाध्ये यांची तर कार्यवाहपदी जयंत अभ्यंकर यांची निवड करण्यात आली.

 

 

राजापूर नगर वाचनालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर वाचनालय सभागृहात पार पडली.

यावेळी सभासदांमधून प्रभात पाध्ये यांनी आपण अनेक वर्षे या संस्थेचे सभासद आहोत. मात्र स्थानिक नसल्याने आपल्याला संचालक राहण्यात अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर तालुक्याच्या विविध भागातील सभासदांना संचालक राहता येईल या दृष्टीने घटनेत बदल करून तसा पाठपुरावा सर्वसंबधींकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

तर अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेत अधिकाधिक लोकांना काम करता यावे म्हणून सध्याची संचालक संख्या सात वरून नऊ करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. नव्या कार्यकारिणीत तसा बदल करताना नऊ संचालक निवडण्याचे ठरले. त्याप्रमाणे सन २०२५ ते २०२९ या वर्षाकरिता संचालक म्हणून प्रभात श्रीराम पाध्ये, जयेश हर्डिकर, राजेंद्र रानडे, जयंत अभ्यंकर, शेखरकुमार अहिरे, किशोर जाधव, अॅड. अतुल नवरे, सुहास ओळकर, शेखरकुमार अहिरे व सौ. श्रृती ताम्हनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामधून अध्यक्षपदी प्रभात पाध्ये, उपाध्यक्षपदी शेखरकुमार अहिरे, कार्यवाहपदी जयंत अभ्यंकर तर सहकार्यवाहपदी सुहास ओळकर यांची संचालक सदस्यांतून निवड करण्यात आली.

 

 

प्रारंभी विविध क्षेत्रातील दिवंगताना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विषय पत्रिकेप्रमाणे सभेचे कामकाज सुरू झाले. कार्यवाह मदन हजेरी यांनी प्रास्ताविक करून काही अपरिहार्य कारणास्तव आपल्याला जावे लागत असल्याचे सांगून ते निघून गेले. ग्रंथपाल पद्मजा कारेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यावर चर्चा होवून मागील सभेतील काही महत्वाचे मुद्दे इतिवृत्तात नसल्याचे काही सभासदांनी निदर्शनास आणून दिले.त्यावर अध्यक्ष श्री. वालावलकर यांनी दुरूस्तीसह ते मुददे समाविष्ट केले जातील असे सांगितले. तसेच विषयपत्रिकेप्रमाणे विविध विषयांवर चर्चा होवून त्यांना मंजूरी देण्यात आली.

 

 

अध्यक्षीय भाषणात वालावलकर यांनी आपल्या कारकिर्दीतील कामकाजाचा आढावा घेतला. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी सभागृहातून मांडण्यात आला. तर नूतन कार्यकारी मंडळाचा ठराव दिनानाथ कोळवणकर यांनी मांडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपाध्यक्ष किशोर जाधव, संचालक अॅड. अतुल नवरे, जयंत अभ्ंकर तसेच सभासदांमधून सुनिल जठार, सुयोगा जठार, प्रकाश कातकर, अभिजीत अभ्यंकर, अमित नवरे, संतोष बापट, पंकज घाटे, रघुवीर बापट, मोहन बापट, सुभाष बाकाळकर, अॅड, चंद्रशेखर अभ्यंकर, प्रकाश भावे, लखू लोळगे, प्रसाद मोहरकर, सुधाकर प्रभुदेसाई, सौ. निशिगंधा चव्हाण, सौ. गौरी अभ्यंकर, सौ.माधवी हर्डीकर, आदींसह बहुसंख्य सभासद उपस्थीत होते.