शिवसेना गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद भोजने यांचे तहसिलदार गुहागर यांना निवेदन
मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक दाखले तातडीने मंजूरी करावे असे निवेदन शिवसेना गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद भोजने यांनी गुहागर तहसीलदार यांना दिले आहे.
यावर्षी इ.१० वी व १२ वीचे निकाल अनुमानपेक्षा एक महिना लवकर लागल्याने विद्यार्थ्यांची व पालकांची दाखल्यांसाठी तारांबळ उडाली आहे ज्युनिअर कॉलेज, आयटीआय, तंत्रशिक्षण व अन्य शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले नॉन क्रिमीलेअर व वय अधिवास / राष्ट्रीयत्व दाखले तसेच मराठा जातीतील विद्यार्थ्यांना ख्या दिले जाणारे नॉन किमीलेअर दाखले सादर करण्याचे बंधन व ठराविक कालावधी दिल्याने पालकामाने गोंधळ उडालेला आहे.
महा ई सेवा केंद्र व सेतु मध्ये चौकशी केली असता दाखले ऑनलाईन केलेले आहेत, परंतु मंजूरी नसल्याने देता येत नाही असे कारण दिले जाते तरी सदर बाबींचा विचार करता प्रशासन स्तरावर दाखले मंजूरीस विलंब होत असल्याचे दिसते. जरी शासनाने सेवा हमी कायद्याच्या आधारे दाखले दिले जावेत हे खरे असले तरी शिक्षणसंस्थांच्या मागणीला पालक अरत आहेत
तरी सर्व गोष्टीचा विचार करून दाखले आपले स्तरावर त्वरीत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अन्यथा पालकांसोबत उग्र आदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशाराही शिवसेना गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद गोविंद भोजने यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मा.ना.उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी, मा जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा.प्रांताधिकारी, चिपळूण, मा.
शशिकांत चव्हाण, जिल्हाप्रमुख शिवसेना यांना देण्यात आले आहे.











