सागरी पोलीस ठाणे जयगड येथे नवीन कायदे विषयक कार्यशाळा घेण्यात आली

खंडाळा | वार्ताहर : आज दिनांक 01/07/2024 रोजी सागरी पोलीस ठाणे जयगड व जयगड हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांचे सह तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य, महिला दक्षता समिती कार्यकर्त्या, शांतता कमिटी सदस्य यांची नवीन कायदा विषयक कार्यशाळा जयगड पोलीस ठाणे सभागृह येथे घेण्यात आली.

 

 

यावेळी सर्वांना नवीन कायद्याचा उद्देश यासह नवीन कायद्यातील बदल याबाबत मार्गदर्शन API श्री कुलदीप पाटील साहेब यांनी केले तसेच सर्वांच्या शंकेचे निरसन करण्यात आले. त्यांना कायद्यातील बदल व माहिती अनुषंगाने पत्रके वाटून तसेच लोकांना माहिती देऊन जनजागृती बाबत सूचना देण्यात आल्या.