भाजपा आंबोली मंडलातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

By BJP Amboli Mandal Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebration

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी आंबोली मंडलच्यावतीने भाजपा सावंतवाडी तालुका कार्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती आनंद नेवगी यांच्यासह भिकाजी राऊळ, संतोष मेस्त्री, प्रशांत जाधव आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.