राहुल गांधींच्या विरोधात भाजप आमदारांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

विधान परिषदेचे गटनेचे अंबादास दानवे यांचे निलंबन करा, भाजपा आमदारांची मागणी

हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही,राहुल गांधीनी हिंदू धर्माची माफी मागावी

भाजप आमदारांनी निषेध करत केली मागणी 

संतोष राऊळ (विधान भवन)हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर निषेध करत,भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अंबादास दानवे यांचे वर्तन आणि केलेले विधान विरोधी पक्ष नेत्याला शोभणारे नाही. त्यामुळे त्यांचे सभागृहातून तातडीने निलंबन करा. अशा मागणी यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आमदारांनी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आज २ जुलै रोजी च्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर हिंदूंचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध केला. तर राहुल गांधींच्या या विधानावर चर्चा असताना परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या आमदारांना केलेल्या शिवीगाळ केली.त्याचे फार मोठा प्रमाणात पडसा आज सभागृहाच्या पायऱ्यांवर उमटले.

राहुल गांधींचे करायचं काय,.. खाली डोकं वर पाय…औरंगजेब के अवलादों को गोली मारो सालों को…. हिंदूंचा अपमान नहीं सहेंगे,अंबादास दानवे चे निलंबन करा. अशा घोषणा देण्यात आल्या. या विधानसभा पायरीवर परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्री आमदार असे सर्वच आमदार उपस्थित होते.