गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी आपल्या मनोगतातून डॉ. प्रमोद देसाई यांनी वसंतराव नाईक हे सर्वात जास्त कालावधीसाठी राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. असे सांगून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. आणि उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांना वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, डॉ. प्रवीण सनये, डॉ. सुभाष खोत, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, ग्रंथपाल श्री धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर श्री. परशुराम चव्हाण व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांचन कदम यांनी केले तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले











