कॅथॉलिक पतसंस्थेकडून “समुह कर्ज सुरक्षा योजना” अंतर्गत मयत कर्जदारांच्या वारसांना २ लाख अर्थसहाय्य प्रदान

Google search engine
Google search engine

2 lakh financial assistance to heirs of deceased borrowers under “Group Debt Security Scheme” by Catholic Credit Union.

सावंतवाडी । प्रतिनिधी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या पतसंस्थेमार्फेत संस्थेच्या कर्जदारांकरीता त्यांच्या हिताच्या दृष्टीने “समुह कर्ज सुरक्षा योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कर्जदाराचा २ लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येतो. अलीकडेच संस्थेचे मयत झालेले कर्जदार कै. राजन खेमबहादूर थापा व कै. गोविंद लक्ष्मण शेलटे राहणार शिरोडा ता. वेंगुर्ला यांच्या वारसांना या योजने अंतर्गत संस्थेचे सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा व सरव्यस्थापक जेम्स बॉर्जीस यांच्या हस्ते संस्थेमार्फेत प्रत्येकी २ लाखाचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. संस्थेमार्फेत केलेल्या या मदतीकरीता मयत कर्जदारांच्या वारसांनी संस्थेचे तसेच संस्थेच्या संचालक मंडळाचे आभार मानले व संस्थेच्या कार्याबद्दल कौतुकही केले. संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या या विमा योजनेचा फायदा कर्जदारांच्या वारसांना देण्यात आला म्हणून संस्थेचे अध्यक्ष पि. एफ. डॉन्टस यांनी समाधान व्यक्त केले.