बाबासाहेबांच्या मुळगावी अलोट गर्दी

A lot of crowd at Babasaheb’s Native Place

दोन वर्षानंतर गर्दीचे चित्र

मंडणगड | प्रतिनिधी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 132 जंयत्ती मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मुळगावी राज्यशासनाच्यावतीने प्रथमच साजरी कऱण्यात आली. या कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम यांची मुख्य उपस्थिती लाभली. सकाळी 10.00 वाजता आंबडवे येथे पालकमंत्री व आमदार यांचे आगमन झाले. आबंडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मारकात त्यांनी ध्वजारोहण करून प्रथम बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच अस्तिकलशाचे दर्शन घेतले. यानंतर बुध्दवंदना, त्रिसुपर्ण या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती लाभली. यानंतर आयोजीत जाहीर कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्याला मनोगतातून उजाळा देताना त्यांच्या कर्तुत्वाला अभिवादन करण्यात केले. आंबडवे येथील जंयत्तीच्या कार्यक्रमास मंडणगडसह आसपासच्या तालुक्यातील आंबडेकरी अनुयायांची मोठी उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही लाभली. कोरोना विषाणु संसर्गामुळे गेली तीन वर्ष लहान स्वरुपात होणारी भिम जंयत्ती पंरपरा यंदा पुन्हा मोठ्या उत्साहात सुरु झाली.

या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता बाबासाहेब व त्यांच्या चळवळीशी संबंधीत असलेल्या ठिकाणीं भेट देत महामानावस अभिवादन करण्यात आले. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांकरिता बाबासाहेबांचे मुळगाव आंबडवे यांचबरोबर बाबसाहेबांनी सत्याग्रह केलेले महाडचे चवदार तळे या दोन स्थळांचे विशेष महत्व आहे. 132 व्या जंयत्तीचे या निमीत्ताने तहसिल कार्यालय मंडणगड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडवे यांच्यातीने विविध कार्यक्रमांचे आय़ोजनही करण्यात आले होते. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड, महाड, इत्यादी तालुक्यातून आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांचे गावास भेट देत महामानवास विनम्र अभिवादन केले. या निमीत्ताने पुरुष अनुयायांबरोबर महिला अनुयायांनीही आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मोठ्या संख्येने भेट दिली. व्याख्याते सर्वजित बनसोडे यांचे व्याख्यान, सायंकाळी ७ वा. भीम गीतांचा कार्यक्रम ( श्री. विजय घाडगे व अष्टशीला बनसोडे ) आयोजीत करण्यात आला होता. दरम्यान मंडणगड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी जंयतीचे कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते.