हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगनंतर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झालाआहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमी आणि मृतांना बस आणि टेम्पोमध्ये भरुन सिंकदराऊ सीएचसी आणि एटा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. एटा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा खच पाहून कर्तव्यावर असलेल्या शिपायाला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिस शिपायाला हार्ट अटॅक
हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर क्युआरटीच्या ड्युटीवर तैनात असलेले शिपाई रवी यादव (राहणारे अलीगड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवी यादव यांची ड्युटी मृचदेहांची व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की, शिपाई रवी यादव यांची ड्युटी हाथरस दुर्घटनेत मृतदेहांच व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. ड्युटी दरम्यानच त्यांना हार्ट अटॅक आला.
एटाचे एसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, हाथरस जिल्ह्याच्या मुगलगढी या गावात एक धार्मिक कार्यक्रम सुरु होता. तेव्हा अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह एटा रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचेही मृतदेह होते. या सर्व मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. या घटनेमागील कारणांच्या तपासासाठी एडीजी आग्रा आणि अलीगडच्या आयुक्तांचं पथक तयार करण्यात आलं आहे.
हाथरसमध्ये भोले बाबा नावाच्या व्यक्तीचं सत्संग सुरु होतं. तिथले लोक या बाबाला खूप मानतात. त्याचं सत्संग ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. जेव्हा या बाबाची गाडी बाहेर पडली तेव्हा त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली, यातच चेंगराचेंगरी झाली. काही लोक खाली पडले, त्यांच्यावर पाय ठेवून इतर लोक गेले. या घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यका आहे. तर, भोले बाबा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
लखनऊ: हाथरस येथील पुलराई गावात मंगळवारी दुपारी एक भयंकर दुर्घटना घडली. येथे भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११६ जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात सत्संगसाठी मांडव घातलेला होता सत्संग संपल्यानंतर गुरुजी यांची कार निघाली आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी लोक धावले. यातच चेंगराचेंगरी झाली. अनेकजण खाली पडले, तर इतर लोक त्यांच्या अंगावर चढून पुढे गेले.
एका प्रत्यक्षदर्शी रामदासने सांगितलं की, तो आपल्या पत्नीच्या औषधांसाठी तिला घेऊन अलीगडला गेला होता. तिथून परत येत असताना ते वाटेत सत्संगमध्ये सहभागी झाले. ही व्यक्ती सेवा देणाऱ्यांजवळ बसली तर त्याची पत्नी सत्संगमध्ये गेली आणि त्यांची पत्नीही या चेंगराचेंगरीत अडकली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
अचानक मोठी गर्दी दिसली अन्…
मांडवापासून लांब बसलेले असताना अचानक खूप मोठी गर्दी दिसून आली. जवळपास दीड ते २ लाख लोकांची गर्दी होती. जिथे हा कार्यक्रम होता ते शेत ५०-६० एकरात पसरलेलं होतं. संपूर्ण रस्ता जाम होता. या व्यक्तीची पत्नी ही भोले बाबा यांना खूप मानत होती, अशीही माहिती या प्रत्यक्षदर्शीने दिली.
याप्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज हाथरसला येणार आहेत. मुख्यमंत्री हे सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. याचा अहवाल २४ तासाच्या आज देण्याच्या सूचना करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आवश्यक निर्देश दिलेत. तसेच, आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत.












