चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता. सीआरएस फंडातून घरडा केमिकल्स कंपनी आणि कंन्साई नेरोलॅक प्रा लि. आस्थापनेचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यालयासाठी सीएसआर फंडातून फरशी बसवून दिलेल्या घरडा केमिकल्स कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल भोसले व सीएसआर मॅनेजर, बापूराव पवार तसेच या कार्यालयाच्या इमारतीला रंगरंगोटी करुन दिलेल्या कंन्साई नेरोलॅक प्रा. लि.चे युनियन अध्यक्ष तुषार घाग व एच. आर. मॅनेजर नंदन सुर्वे यांचा शाल, श्रीफळ व वृक्षभेट देवून कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी अनिल भोसले यांनी कामगार कल्याण मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या व कामगार कल्याणकारी योजना सर्व कामगारापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देताना आपल्या सामाजिक दायीत्वाच्या भुमिकेत सदैव अग्रेसर असलेल्या घरडा केमिकल्स कंपनीचे भविष्यातही बहुमोल सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन केले.
तसेच तुषार घाग यांनी कन्साई नेरोलॅक कंपनी कलर क्षेत्रात अग्रेसर असून कंपनी मार्फत अनेक सामजिक उपक्रम राबविले जातात. कामगारांच्या कल्याणासाठी अविरतपणे राबविणाऱ्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या इमारत कलरचे काम सीएसआर फंडातून करुन दिले आहे. कंपनी मार्फत मागणीनुसार मदत करु अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रम प्रसंगी रविकिरण पिंपळे, उपअभियंता एमआयडीसी, चिपळूण व रामदास जाधव सहाय्यक अभियंता, एमआयडीसी, चिपळूण तसेच गुणवंत कामगार शिवाजी शिंदे, मानसिंग यादव, वसंत चिपळूणकर, दौलत वाळुंज, कंत्राटदार, दिपेश उकिर्डे, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत अरुण लाड, कामगार कल्याण अधिकारी यांनी केले. आभार केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी मानले. यावेळी कर्मचारी दिपक गायकवाड, ऋतुजा जोर्वेकर, अक्षता जोशी, ज्योती गाडे, स्नेहा चव्हाण, संगीता सुवार, संस्कृती शिंदे, स्मिता शिंदे, नम्रता खेडेकर यांनी सहकार्य केले.










