धोकादायक स्थितीत तात्काळ हटवा वाहन धारकांची मागणी
न्हावेली प्रतिनिधी- श्रेयस गावडे
सावंतवाडी मळेवाड मार्गावरील मळगाव सबवेवर एका कंपनी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत ते फलक तुटून धोकादायक स्थितीत आहेत.
सबवेवर लावण्यात आलेले कंपनीचे जाहिरात फलक धोकादायक स्थितीत असून ते केव्हाही तुटून पडून अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही अश्या घटना घडल्या देखील आहेत.
संबधित कंपनीने यावर लक्ष देऊन हे फलक तात्काळ हटवावे अशी मागणी वाहन धारक करत आहेत.










