रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधिक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणूनच ते पुढे कार्यरत राहणार आहेत.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ऑक्टोबर 2022 रोजी रत्नागिरीला नियुक्ती झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसह बारासू येथील रिफायनरीचा प्रश्नांसह जिल्हयाच्या सुरक्षा आणि सामाजिक सलोखा याकडे त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केल्याने अनेक गुन्ह्याची सहज उकल झाली आहे.
बुधवारी संध्याकाळी श्री कुलकर्णी यांच्या पदोन्नतीची बातमी रत्नागिरीत धडकली. त्या पाठोपाठ त्यांच्या बदलीचीही चर्चा सुरू झाली. श्री. कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षक म्हणून बढती झाली आहे. तसे आदेश निघाले आहेत मात्र ही पदोन्नती नंतरही त्यांनी रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक म्हणून काम पाहणार आहेत हे आदेशात स्पष्ट झाले आहे.
या पदोन्नतीबद्दल श्री कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










