जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विविध भागधारकांचे प्रशिक्षण पंचायत समिती ,संगमेश्वर ( देवरूख) येथे संपन्न …..

Training of various stakeholders at Gram Panchayat level under Jal Jeevan Mission was completed at Panchayat Samiti, Sangameshwar (Devarukh).

▪️जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत सतरांवरिल विविध भागधारकांचा योजनेच्या नियोजन, अंमलंबजावणी व देखभाल – दुरूस्ती टप्प्यावर सहभाग वाढवा तसेच गांवस्तरावर पाण्याचे सुयोग्य नियोजन व्हावे यासाठी सदरच्या प्रशिक्षणासाठी सरपंच , आशा सेविका , अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्य याना प्रशिक्षणासाठी पाचारण करणेत आले होते.दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणमध्ये योजनाची देखभाल – दुरूस्ती व हंस्तारंण प्रक्रिया, पाईपचे प्रकार व फिटींग , पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता, ग्रामिण पाणी पुरवठा समितीच्या जबाबदारी व कर्तव्य , पाणी गुणवत्ता व त्यांचे महत्त्व विविध तपासणी व त्यांचे प्रात्यक्षिक, पंपाचे प्रकार व प्रतिबंधात्मक उपाय-योजना इ.विषय तज्ञ मार्गदर्शकानी घेतले. सदरच्या प्रशिक्षणाची सुरवात पंचायत समिती संगमेश्वरचे ( देवरूख ) गट विकास अधिकारी श्री .भरत चौगुले यांनी प्रशिक्षणार्थीना जल प्रतिज्ञेनेची शपथ देवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मा. प्रकल्प संचालक ( जल जीवन मिशन)श्री .राहूल देसाई यांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपञ देवून सांगता करणेत आली. यावेळी उपअभियंता श्री. रामकृष्ण लडाट , सहाय्यक गटविकास अधिकारी , सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते.