खेड (प्रतिनिधी) तालुक्यात लाडकी बहीण योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी येथील प्रशासन सज्ज झाले असून याबाबत महिलांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचा निपटरा करण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठींना आवश्यक त्या सुचना येथील तहसिल सुधीर सोनावणे यांनी दिल्या आहेत.
राज्य शासनाने अर्थसंकल्पात महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ अन्नपूर्णा इत्यादी योजनांचे लाभ खेड तालुक्यातील महिलांना
मिळवून देण्यासाठी खेड तालुका प्रशासन सज्ज झाले असून खेडचे तहसिलदार सुधीर सोनवणे यांनी मंगळवारी सकाळी तहसिल कार्यालयात तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही योजना प्रभावीपणे राबण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे. यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार असून ३१ ऑगस्टपर्यंतच कागद पत्रे देण्याची मुभा दिलेली आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे, सोमवार पासूनच पटवारी, तलाठी सेतू तसेच झेरॉक्स दुकानावर महिलांची गर्दी झाली आहे. खेड तालुक्यात देखिल ही योजना प्रभावीपणे राबविता यावी. यासाठी खेड तालुका प्रशासन सज्ज झाले असून मंगळवारी सकाळी खेड पंचायत समितीच्या सभागृहात तहसिलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.









