सावरवड येथे कृषीदूतांनी राबवले सरकारी योजनांचे माहिती शिबिर

सावंतवाडी : सावरवाड येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी सरकारी योजनांविषयी माहिती शिबिर दि. ०५/०७/२०२४ ला आयोजित केले होते. या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा सांगेली , शाखा व्यवस्थापक श्री.जगदीश चव्हाण आणि ई-महासेवा केंद्राची संचालिका सौ. सीमा मठकर आणि सहकारी उपस्थित होते,त्याचप्रमाणे गावचे सरपंच देवयानी पवार आणि सदस्य सौ. सुवर्णा कुडतरकर यादेखील उपस्थित होते.

या शिबिरात कृषी विषयक सरकारी योजना, पीक विमा, कृषीकर्ज या संबंधित माहिती दिली व शेतकऱ्यांना शेती संदर्भात नवीन व्यवसाय सुरू करण्यात प्रेरणा दिली. हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रसाद ओगले, प्रा.गोपाळ गायकी, प्रा.महेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत अथर्व मठकर, लक्षदिप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली, अनिरुद्ध.पी, अरुणदेव.सी. पी यांनी उत्साहात पार पाडले.