सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील “महेंद्रा अकॅडमी” मध्ये शिकत असलेल्या तळवडे येथील नागेश निलेश दळवी या वीस वर्षीय विद्यार्थ्याची “पॅराकमांडो” म्हणून सैन्य दलात निवड झाली आहे. त्याला पुढील प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार आहे.
नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या अग्निविर परीक्षेत तो यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने पॅराकमांडोसाठी प्रयत्न केले होते. यात पाच किलोमीटर मैदान त्याने अवघ्या १८ मिनिटात पार केले. त्यामुळे त्याची तात्काळ निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवडी बद्दल संस्थेचे संचालक महेंद्र पेडणेकर व अन्य शिक्षकांनी त्यांचा सन्मान केला. दळवी याची परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील शेती करतात. तरीही परिस्थितीवर मात करीत त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याच्या या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
Sindhudurg