स्व. संजय धुरी यांच्या कथा काव्य संग्रहाचे रोटरी क्लब तर्फे प्रकाशन

देवगड l प्रतिनिधी :एखाद्या बसल्या ठिकाणी काव्य करण्याची स्व.संजय चे अंगी असलेल्या काव्य लेखनाच्या कलेने भारावून गेलो व त्याने केलेल्या कथा,काव्य लेखनाचे प्रकाशन करण्याचे दिलेले वचन,दिलेला शब्द पूर्ण करू शकलो.यासारखा दुसरा कोणताही आनंद नसून या कथा काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे.हीच त्यांना खरी स्वरांजली ठरत आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब मँगो सिटी देवगड डिस्टिड्ढक्ट-३१७० चे पी.डी.जी.उद्योगपती रोटे संग्राम पाटील यांनी जामसंडे येथे स्व.संजय काव्य कथा या पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी बोलतांना केले.

 

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आयोजित स्व.संजय धुरी यांच काव्य व कथा संग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन य्व.संजय धुरी यांच्या प्रतिमस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे पी.डी.जी.संग्राम पाटील,कोल्हापूर डिस्टिड्ढक्ट-३१७० कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद जोशी-वाडा,देवगड(लेखक आणि शीघ्रकवीदेवगड) रोटे,सौ.उत्कर्षा पाटील रोटे,डॉ.विद्याधर तायशेटे,रोटे.प्रसिडेंट रोटे.प्रविण पोकळे,रोटे-हनीफ मेमन,qसधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर,रोटे.मनस्वी घारे यांनी स्व.संजय याच्या आवडीचे अटलजी चे काव्य सादर केले.आयुष धुरी,अनुप धुरी आदी उपस्थित होते.सोहळ्याचे अध्यक्ष कवी प्रमोद जोशी यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांचे उपस्थितीर्त संजय कथा,काव्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

रोटे.प्रसिडेंट प्रवीण पोकळे यांनी प्रस्ताविक करून संजयच्या स्मृतींना उजाळा दिला.मित्र राजू पाटील जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर,रोटे.दादा कुडतरकर यांनीही आपले अनुभव कथन केले.स्व.संजय धुरी यांच्या स्ूरणार्थ रोटरी चे माध्यमातून ब्लड स्टरेज युनिट,वॉटर एटीएम,रोटरी महोत्सव या सारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे रोटे.डॉ.विद्याधर तायशेटे यांनी सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी प्रमोद जोशी यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा हा शा उत्सव शब्द ब्रह्माचा सोहळा आहे.असे सांगून संजय आणि आठवण,सहाण चंदन हे स्व.संजय धुरी यांचेवरील काव्य सादर केले.सूत्रसंचालन ऋत्विक धुरी तर आभार मनीषा डामरी यांनी मानले.