सुखनदीला पूर; खारेपाटण बाजारपेठेत घुसले पाणी

सुख नदीवरील जुन्या पुलावरील वाहतूक केली बंद

तहसीलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी दाखल, जनतेला सावधगिरीचा दिला इशारा

नदीकिनारी असलेल्या कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्या दिल्या सूचना

कणकवलीत पावसामुळे झाडे उनमळून पडली, वीज पुरवठा खंडित

कणकवली :
कणकवली तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने खारेपाटण सुख नदीला पूर आला आहे त्यामुळे बाजारपेठेत पाणी घुसले असून बाजारपेठ रस्ता पाण्याखाली आलेला आहे एसटी स्टँड आणि परिसरात पाणी घुसलेले आहे एसटी स्टँड कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तर मुंबई गोवा महामार्गाच्या सुख नदीवरील जुने पूल बंद करून नव्या पुलावरूनच वाहतूक सुरू ठेवण्यात आलेले आहे. पुराची वस्तुस्थिती आणि त्या ठिकाणची खबरदारी घेण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे घटनास्थळी पोचले असून पुराच्या पाण्यात कोणतेही कुटुंब अडकू नये यासाठी ते स्वतः काळजी घेत आहेत.दरम्यान कासार्डे पोलीस दुरक्षेत्राला पाण्याचा वेढा पडला आहे. आचरा रोडवर वरवडे येथे पाणी चढले तर मराठा मंडळ रोड आणि गड नदीच्या केटीवेल बंधार्यानवर पाणी चढले. कलमठ वरवडे व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.


शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती प्राप्त झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे येथे असलेले पोलीस दूरक्षेत्रालाही या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे . मुंबई गोवा महामार्गाचे काम केल्यानंतर पुराचा फटका या पोलीस दूरक्षेत्राला बसत आहे. नरडवे रोड वर नाटळ दुबळेश्वर येथे मुसळधार पावसा मुळे रस्त्यावर झाड पडुन वाहतुकीची कोंडी झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत पर्यंत वाहतूक बंद होती. स्थानिक लोकांच्या मदतीने झाड तोंडुन वाहतुक सूरळीत करण्यात आली. ठिकठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा झाला खंडित.