अनेक ठिकाणी पडझड ; दाभोळे, शिरगाव येथे घरावर झाड कोसळले
शिरगाव बाजारपेठेत महाकाय वटवृक्ष कोसळला ; देवगड नांदगांव मार्ग बंद
देवगड:प्रतिनिधी
देवगड तालुक्यात पावसाने रविवारी सकाळपासून धुव्वाधार सुरूवात केल्याने ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून दाभोेळे शिरगाव या दोन गावांना वादळी वाèयासह पडलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.घरांवर झाडे पडून तसेच शिरगाव बाजारपेठ ेत मोठा वटवृक्ष उन्मळून दुकानाच्या पडवीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.वटवृक्ष कोसळल्याने देवगड नांदगांव मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

देवगड मध्ये पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले.सकाळपासून वादळी वाèयासहीत धुव्वाधार पाऊस पडल्याने दाभोळे व शिरगाव येथील घरांची पडझड झाली आहे.दाभोळे येथील रस्त्यालगत असलेली दरड कोसळल्याने दाभोळे पुल ते दाभोळे ग्रामपंचायतपर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद झाला.तेथिल आत्माराम कुळकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ३० हजाराचे नुकसान झाले तर शिरगाव बाजारपेठ येथील प्रदीप वाडये यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले.देवगड निपाणी मार्गावरील शिरगाव बाजारपेठ ेत महाकाय वटवृक्ष मुळासहीत व्यापारी पुंडलिक शेट्ये यांच्या दुकानावर कोसळला.यामध्ये त्यांच्या दुकानाच्या पडवीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.











