ऐनवली मध्ये शेत तळ्याचे प्लॅस्टिक कागद चोरीस

 

खेड(प्रतिनिधी)  खेड तालुक्यातील ऐनवली येथील एका शेतकऱ्याच्या शेत तळ्याचे सुमारे १० हजार रुपये किमतीचे प्लॅस्टिक काळा कागद अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ६ जुलै रोजी उघडकीस आली

शेतकऱ्याच्या मालकीच्या जमीन जागेत असलेले शेत तळ्याचे प्लॅस्टीक कागदाचा अर्धा भाग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघड झाल्या नंतर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या नंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे