पूरग्रस्तांना जेवण, नाश्ता, औषधोपचार, आर्थिक मदत या सेवा प्रथम द्या, नुकसानीचे पंचनामे तातडीने करा.

भाजप नेते खास. नारायण राणे

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करतात आरोग्य यंत्रणा हालली!

सिंधुनगरी | बाळ खडपकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना सर्व प्रकारची सरकारी मदत तत्काळ पोहच करा, जेवण नाश्ता औषधोपचार या सेवा प्रथम द्या, नुकसानीचे सर्व पंचनामे त्वरित करा. तातडीची आर्थिक मदत प्रथम द्या अशा सूचना भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाला दिल्या. पूर बाधित कुटुंबातील एक बालक तापाने फणफणत असल्याचे लक्षात येतात त्यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोन लावला. तातडीने वैद्यकीय अधिकारी पाठवा असे आदेश दिले. आरोग्य विभागाच्या या निष्क्रियतेची “त्यांनी” गंभीर दाखल घेताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली!

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी घुसून जिल्ह्यात जवळपास शंभर कुटुंबे बाधित झाली आहेत. जवळपास चारशे बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या पूर परिस्थितीची पाणी करण्यासाठी व नागरिकांना धीर देण्यासाठी, मदत करण्यासाठी भाजप नेते खासदार नारायण राणे तातडीने सिंधुदुर्गात दाखल झाले व त्यांनी ओरोस ख्रिश्चनवाडी पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या. बाधित कुटुंबांशी चर्चा केली व त्यानंतर जिल्हाधिकारी भावनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी माजी खासदार भाजप नेते निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, आपण जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष दादासाहेब, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत , भाजप महिला पदाधिकारी सौ सुप्रियाताई वालावलकर, ओरोस सरपंच आशा मुरमुरे आधी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी सायंकाळी निलेश राणे यांनी धावून येत पूरग्रस्त भागाला भेट देत बाधित कुटुंबांशी संवाद साधला होता. जवळपास शंभर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या पुरात या वाढीतील नऊ ते दहा घरे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. तर वाडीतील अन्यघरांमध्ये पाणी घासून धान्य साहित्य किमती सामान त्याचे फार मोठी हानी झाली आहे. याबाबतची पाहणी नारायण राणे यांनी यावेळी केली बाधित कुटुंबांना धीर दिला. कोणत्याही नागरिकाच्या तक्रारी येता नये म्हणूनच शासकीय मदत कार्य आवश्यक आरोग्य सुविधा प्रथम पोचवा अशा सूचना नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

जिल्ह्यात अशी आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर महसूल आणि आरोग्य यंत्रणा पोलीस दल व आपत्ती व्यवस्थापन या सर्वांनी ॲक्टिव मोडवर काम करावे. अशा आपत्कालीन भागात तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांनी तात्काळ पोहोचायला हवे. सरकारी मदतकार्य प्रथम मिळायला हवे अशा सूचना नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या. रेस्क्यू टीम कमी पडत असेल तर पर्यायी दुसऱ्या रेस्क्यू टीम वाढवा , मालवण व दोडामार्ग तालुक्यात खंडित वीज पुरवठ्याच्या समस्या असून त्याबाबत दक्षता घ्या निलेश राणे यांनी केल्या.

महामार्ग ठेकेदाराची मदत घ्या!
चौपदरी महामार्गामुळे रस्त्याची उंची वाढली आहे या मार्गामुळे पाणी आणले जात असेल तर महामार्ग ठेकेदाराची मदत घेऊन त्याला मार्ग कसा करून देता येईल याबाबत सार्वजनिक बांधकाम व महामार्ग प्राधिकरण यांनी दक्षता घ्यावी. महामार्ग लगतच्या नागरिकांना अशा परिस्थितीत महामार्ग ठेकेदाराने मदत कार्य करावे अशाही सूचना नारायण राणे यांनी यावेळी दिल्या.

जास्त च्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न

कोकणात पडणारा पाऊस या जिल्ह्याची भौगोलिक रचना व त्यात घर गोटे व शेतीचे होणारे नुकसान मोठे असते. राज्याच्या तुलनेत या भागात मोठा पाऊस होत असल्यामुळे वा पाण्याला तीव्र उतार असल्यामुळे फार मोठी नुकसानी होत आहे. या नुकसान भरपाई साठी वेगळा निकष हवा व नुकसान भरपाईची रक्कम वाढीव असावी म्हणून शासन स्तरावर आपण पाठपुरावा करू असेही यावेळी नारायण राणे म्हणाले.

जिल्ह्यात 400 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे, या पुरामध्ये जवळपास 100 कुटुंबे बाधित झाली आहेत, घर व गोट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत, शासनाकडील तातडीची मदत तातडीने चालू करण्यात येत आहे, कृषी विभागाचे पंचनामे ही सुरू करण्यात आले आहेत, कुडाळ आंबेडकर नगर मधील 21 घरे पावशीमधील पाणी घुसल्यामुळे तिथे एनडीआरएफ चे एक पथक मुक्काम ठोकून आहे व मदत कार्य करत आहे ओरोस येतील 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तर जिल्ह्यातील तेरेखोल व कर्ली नदी या दोन नद्या सद्यस्थितीत धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत अन्य तीन नद्या मात्र पूर्ववत नियंत्रणात आहेत अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी नारायण राणे यांनी घेतलेल्या बैठकीत दिली.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे हे अधिवेशनात असल्यामुळे ते येथे पोचू शकले नाहीत. दूरध्वनीवर त्यानी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आपण या ठिकाणी पोचलो असून पूरग्रस्त बाधितांना सरकारी सेवा प्राधान्याने मिळतील, यात कोणाची गैरसोय होणार नाही खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे मी रत्नागिरीतही भेट देणार असून पूर परिस्थितीची पाहणी करणार आहे असेही ते म्हणाले.

Box अन आरोग्य यंत्रणा हालली!

ओरोस डॉन बॉस्को हायस्कूलच्या इमारतीत ओरोस ख्रिश्चन वाडी येथील बाधित कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. या गर्दीत एक मूल तापाने फणफणत होत! बाधित कुटुंबातील नागरिकांशी खासदार नारायण राणे संवाद साधत होते. घर झालेली नुकसानी मुलं अशी चौकशी करता करता त्यांचे लक्ष झोपलेल्या मुलाकडे गेले. त्याला ताप आहे असे समजतात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना त्यांनी थेट फोन लावला. मी इथे उभा आहे, तातडीने डॉक्टर पाठवा, असा इशारा देतात आरोग्य यंत्रणा लागलीच हालली. मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यानीही याबाबत गांभीर्य घ्यावे व पूरग्रस्त भागातील पाणी शुद्धीकरण वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.