साडेचार कोटी खर्चूनही रस्त्यावरून नदी वाहते तेव्हा… भेडशी पूल ठरतोय वाहन चालकांना जीवघेणा !!!

पूल उंचावर तर सखल भागात नदीचे प्रवाही पाणी रस्त्यावर!!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डागडूजी करण्याचा प्रयत्न

दोडामार्ग | सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील रस्ते व पूल बांधण्यात आले आहे यासाठी राज्य सरकारच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गलथान कारभारामुळे त्रस्त झाली आहे हे पहिल्या पावसात आलेल्या पाण्याने दाखवून दिले आहे तालुक्यात भरघोस निधी देखभाल दुरुस्ती करून घेण्यासाठी येत असतो तरीही कामे केली वेळीच न केल्याने अनेक अपघात घडत आहे याला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार याच्यावर वचक नसल्याने हे प्रकार घडत आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जात आहे
काल दोडामार्ग तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाले भरले व प्रवाहाने वाहत होते तर तिलारी आंतरराज्य प्रकल्प मुख्य धरण 50%भरले होते त्यातील पाण्याचा उत्सर्ग बंद असल्याने पूर परिस्थिती आटोक्यात आली होती नाहीतर काल कोसळलेल्या पाऊसाने भेडशी परिसर पाण्याखाली गेला असता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेडशी पुलावरून वाहतूक सुरू होती मात्र सखल भागात नदी रस्त्यावरून वाहत होती भेडशी रस्त्यावरील हा प्रकार काल कोसळलेल्या पाऊसाने दाखऊन दिला मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी पुलासाठी खर्च करूनही रस्ता पाण्यातच पूल उंचावर बांधण्यात आले आहे याबाबत स्थानिक ठेकेदार यांनी वारंवार पुलाबाबत रस्ता भराव टाकून करण्यात यावा व पुलाची उंची द्यावी यासाठी 40 मीटर पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला व खर्च करूनही रस्ता पाण्यातच पूल उंचावर असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहे याच ठिकाणी मोरी बांधण्यात आली या ठिकाणी भराव नसल्याने अनेक दुचाकी स्वार जखमी झाले होते या ठिकाणी ग्रामस्थांनी डागडूजी करून सार्व. बाधकाम विभागाला अद्दल घडवली होती काल कोसळलेल्या पाऊसाने ज्या ठिकाणाहून गाडी वाहून नदी पात्रात गेलेली त्या ठिकाणी आता सार्व. बाधकाम डागडूजी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत
हेवाळे विजघर रस्त्यावर 90मीटर लाबीच्या पुलासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला तर भेडशी पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन रस्ता पाण्यातच पूल उंचावर असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहे याला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार याच्यावर कारवाई केली पाहिजे यासाठी आवश्यक प्रयत्न केले पाहिजेत अंदाजपत्रक तयार करण्यात आले तेव्हा स्थानिक ठेकेदार यांनी वारंवार रस्त्यावर भराव टाकून उची द्यावी यासाठी पाठपुरावा करून दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडत आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व स्थानिक ठेकेदार कडून होत आहे या भेडशी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने बरेच वेळा स्थानिकांनी काम बंद केले होते मात्र अधिकारी वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे प्रमाणात अपघात घडू शकतात यासाठी पाठपुरावा करून उपाययोजना करणे गरजेचे आहे
दोडामार्ग शहरात रस्त्यावर पाणीच पाणी!!!
गटाराचे पाईपलाईनकडे दुर्लक्ष!!!
तिलारी दोडामार्ग रस्त्यावर पाणीच पाणी वारंवार रस्त्यावर अर्धा किलोमीटर अंतरावरील आजूबाजूच्या इमारती बांधल्या परंतु गटार साठी काही ठिकाणी मोठे पाईप लाईन तर काही ठिकाणी लहान पाईप असल्याने ते वारंवार कचरा व पाण्याने जाम होतात व पाणी रस्त्यावर सकल भागात येते यालदे नगरपंचायतीने वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडत आहे यासाठी अनेकदा अधिकारी यांना धारेवर धरले परंतु काही सुधारणा होत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे ही परिस्थिती तालुक्यात ठीक ठिकाणी रस्त्यावर होतं आहे याला जबाबदार अधिकारी वर्ग असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने व निधी उपलब्ध असूनही वेळीच कामे पूर्ण न केल्याने सर्व सामान्य जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते आहे याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी तालुका वासियातून होतं आहे