दोडामार्ग तालुक्यातील शिक्षक आनंदा बामणीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

 

दोडामार्ग | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन मार्फत देण्यात येणारा सन 2024 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग चे शिक्षक श्री. आनंदा लक्ष्मण बामणीकर यांना जाहीर झाला.

श्री. बामणीकर हे उपक्रमशील,तंत्रस्नेही, विद्यार्थीप्रिय
शिक्षक म्हणून ओळखले जातात.
पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व रोख १०००००/- (एक लाख ) असे आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.