दापोली | प्रतिनिधी :
हर्णे येथील खेम धरणात पडलेल्या कल्पेश रुपेश बटावळे याचा शोध घेण्यासाठी एन.डी.आर.एफ (NDRF) टीम होणार उद्या दापोलीत दाखल
उद्या सकाळी ६:३० च्या आसपास पोहचणार (NDRF) टीम होणार दापोलीत दाखल
दापोली प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली माहिती
हर्णे येथील खेम धरणात पडलेल्या मुलाचा 16 तासानंतरही शोध नाही
आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत १८ तास उलटून सुद्धा हर्णै खेम धरणात बुडालेल्या मुलाचा अजूनही शोध लागला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रयत्न सुरू असल्याचे दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी सांगितले.
काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हर्णै खेम धरणामध्ये ही घटना घडली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तन्मय संतोष पड्याल, तुषार संतोष पड्याल, सोयल सौजन्य थोरे आणि कल्पेश रुपेश बटावळे हे सर्व आंजर्ले गावापासून जवळपास असलेल्या सातांबा गावातीलच आहेत. हे चौघेही हर्णै धरणात पोहायला आले होते. हर्णे ग्रामपंचायतीने अलीकडच्या बाजूस पोहोण्यासाठी एक स्विमिंग तलावासारखा तलाव सर्वांना पोहायला बांधला असताना बहुतांशी तरुण मंडळी या मुख्य खोल धरणात पोहायला जातात. त्याप्रमाणे हे चौघेजण त्या मुख्य धरणात पोहायला गेले. येथील सुरक्षारक्षक त्यांना त्या मुख्य धरणात जाण्यास अटकाव करत असताना त्यांचे न ऐकता हे चौघेही तिथे पोहायला गेले. आणि अनर्थ घडला. एकंदर धरणाच्या खोलाईचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडला. दोघेजण बुडू लागले तेथील उपस्थित काही तरुणांनी एकाला वाचवले परंतु कल्पेशला वाचवायला त्यांना जमले नाही त्याचवेळी याठिकाणी कल्पेश बुडाला.
कल्पेश हा रुपेश बटावळे यांचा एकुलता एक मुलगा होता. व एक मुलगी आहे. ती सध्या सहावी इयत्तेत शिकत आहे. रुपेश बटावळे हे त्यांच्या फॅमिलीसह कामानिमित्त मुंबई दहिसर येथे रहातात. त्यांचे गावी देखील घर आहे. कल्पेश दोन दिवसांपूर्वी एकटाच गावी आला होता. त्याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते. नुकताच तो दहिसर येथे पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला देखील लागला होता. वडील रुपेश बटावळे हे मुंबईमध्ये डायमंडच्या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. काल रात्रीच कल्पेश मुंबईमध्ये निघून जाणार होता. परंतु तो काल सायंकाळी हर्णे येथे धरणात पोहायला आला असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. घटना घडल्यावर तातडीने कल्पेशच्या आई वडिलांना मुंबईतुन बोलावण्यात आले. ते आज सकाळी गावी हजर झाले आहेत.
काल सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा साधारण २ वाजेपर्यंत पोलीस व अन्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातांब्यातील ग्रामस्थ शोध घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु काहीही हातास लागले नाही. कारण रात्रीची वेळ होती तसेच पाऊसही प्रचंड पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शोधकार्य लवकर करणार असल्याचे दापोली तहसीलदारांनी सांगितले होते परंतु आज ता. ८ रोजी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दिवसभर दोन छोट्या बोटी घेऊन संपूर्ण धरणाच्या आजूबाजूच्या झाडीमधून शोध सुरू केला आहे. आंजर्ले खाडी किनारी देखील छोट्या होड्या तैनात करून ठेवल्या आहेत. तसेच काठावरून गळाच्या साहाय्याने साधारण खोलईच्या अंदाजाने तेवढा मोठा दोर टाकून गळाला काही लागतंय का ते ही बघायचा प्रयत्न सुरू आहे. असे दापोली तहसीलदार श्रीम. बोंबे यांनी सांगितले.












