प्रख्यात चित्रकार आनंद ठोंबरेचा तामिळनाडूच्या राज्यपालांकडून गौरव

Google search engine
Google search engine

ठोंबरे यांनी साकारलेले स्वामी विवेकानंदांचे तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीचे सुपुत्र जगविख्यात चित्रकार आनंद ठोंबरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे काढलेलं भव्य तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात नुकतच लावण्यात आले. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या हस्ते या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं.

यावेळी आयपीएस आनंदराव पाटील, आयपीएस रवीराजन तिवारी, एडीसी आयपीएस विश्वेष शास्त्री यांच्या उपस्थितीत शाल आणि लक्ष्मीची प्रतिमा देवून राज्यपाल आरएन रवी यांनी चित्रकार आनंद ठोंबरे यांचा गौरव केला. यावेळी त्याच्यासोबत त्याची मुलगी अनन्या ठोंबरे उपस्थित होती.

चित्रकार आनंद ठोंबरे यांनी चितारलेलं स्वामी विवेकानंद याचं तैलचित्रं कन्याकुमारीच्या केंद्रात लावण्यात आलं असून पॅरिसमधील प्रिंन्स अलिखान, मातोश्रीवरील बाळासाहेब, माँसाहेब, धिरूभाई अंबानी, ठाण्यातील आनंद दिघे यांच काढलेलं तैलचित्र तसेच कुडाळ,सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरील मधु दंडवते यांची तैलचित्र अद्यापही लक्षवेधी ठरलेली आहेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते माटुंग्याच्या वेलिंगकर कॅालेजमधे ठोंबरे यांना नुकतचं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर चेन्नई येथे शासनाकडून या चित्रकाराचा सन्मान करण्यात आल्याने ठोंबरेंच्या चाहत्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Sindhudurg