एम क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडतील : युवराज लखमराजे भोसले

सावंतवाडीत एम अकॅडमी आयोजित १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

सावंतवाडी । प्रतिनिधी :

एम क्रिकेट अकॅडमी मुलांसाठी घेत असलेल्या विविध गटांच्या स्पधांच्या माध्यमातून येथील मूलांना संधी उपलब्ध होत आहे. यातून उद्याचे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे व देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू निर्माण होणार आहेत. सिधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू घडवणाऱ्या या उपक्रमांचे निश्चितच कौतुक आहे, असे गौरवोद्गार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत भोंसले यांनी काढले.

एम क्रिक्रेट अकॅडमी सावंतवाडी आयोजित १४ वर्षांखालील मुलांची भव्य क्रिकेट स्पर्धा १३ एप्रिल ते २३ एप्रिल पर्यंत सावंतवाडी जिमखाना मैदानावर तसेच मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंडवर सुरु झाली आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत भोंसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी युवराज लखमराजे भोंसले यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांना क्रिकेट बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, खजिनदार अक्रम खान, स्पोर्ट्स अथॉरीटी ऑफ गोवाचे सेक्रेटरी विवेक लाड तसेच संदीप नाईक आदी उपस्थित होते. सावंतवाडी व मालवण येथे सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली तसेच रत्नागिरी येथील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आभार खजिनदार अक्रम खान यांनी मानले.

Sindhudurg