Lanja Breaking: Today’s special general meeting of Nagar Panchayat will be held
लांजा उपनगराध्यक्ष पूर्वामुळे यांनी बजावला नगरसेवकांना व्हिप
मात्र लांजा नगरपंचायतीमधील 12 नगरसेवक आज्ञातस्थळी रवाना
उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांचा व्हिप झुगारून करणार ठरावाच्या बाजूने मतदान
कोणत्याही परिस्थितीत पूर्वा मुळे यांच्यावरील अविश्वास ठराव करणार संमत
सोमवारी १७ एप्रिल च्या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष
लांजा : संतोष कोत्रे : लांजा नगरपंचायतीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर १२ नगरसेवक हे अज्ञातस्थळी रवाना झाले असून सोमवारी १७ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेप्रसंगी ते उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने मतदान करणार आहेत. तर दुसरीकडे उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांनी लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला आहे .त्यामुळे सोमवारी होणाऱ्या या विशेष सर्वसाधारण सभे कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकीय सत्ता संघर्षामध्ये लांजा नगरपंचायतीमधील शिवसेनेचे दोन गट पडले आहेत पैकी शिवसेना शिंदे गटाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांना पदावरून हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे. यासाठी पूर्वामुळे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव संमत करण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच १२ सदस्यांची आवश्यकता आहे. म्हणूनच शिवसेना शिंदे गटाचे पाच नगरसेवक तसेच काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपाचे तीन असे एकूण १२ नगरसेवक हे अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत .सोमवारी १७ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेप्रसंगी हे बाराही नगरसेवक नगरपंचायतीमध्ये उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने मतदान करणार आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे या अडचणीत आलेल्या आहेत.
एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडी या गटाचा अधिकृत घटनेचा म्हणून माझी निवड झालेली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी मला या पदावरून काढलेले नाही, असे सांगत उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांनी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्यासह शहर विकास आघाडीच्या सर्व १४ नगरसेवकांना व्हिप बजावला आहे . तसेच ठरावाच्या विरोधात मतदान न केल्यास पक्षादेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यात येईल अशी देखील त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे सोमवारी १७ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडीच्या गटनेत्या तथा उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्या विरोधात जाऊन हे नगरसेवक त्यांच्या विरोधात मतदान करून त्यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटवण्याच्या दृष्टीने ठराव संमत करणार का? किंवा या व्हिपमुळे अडचणीत येऊ या भीतीचे हे नगरसेवक पूर्वा मुळे यांच्या बाजूने अठरावाच्या विरोधात मतदान करणार का? याकडे आता लांजावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.