मालवण | प्रतिनिधी : ओवळीये रामेश्वर मंदिर शेजारी असलेला लोखंडी साकव मुसळधार पावसात कोसळला. यामुळे विध्यार्थी तसेच ग्रामस्थ यांचा मार्ग बंद झाला आहे. काही अंतरावरून फेरा मारून मार्ग काढावा लागणार आहे. तरी प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी केली आहे. याबाबत भाजपा नेते निलेश राणे यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.
या साकवं चा वापर पलीकडे असलेल्या प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक आहे. मात्र साकवं कोसळल्याने विध्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना मोठी पायपीट करावी लागणार आहे. बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.











