ओटवणे(प्रतिनीधी) शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्हयात तृतीय क्रमांक मिळविलेल्या माडखोल धवडकी नंबर २ या शाळेचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर अभिनंदन करताना यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षक वृंद विद्यार्थी यांचेही कौतुक केले.आणि शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ – सावंतवाडी च्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी मंत्री दिपक केसरकर हे उपस्थित होते .
या अधिवेशना मध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला . माडखोल धवडकी नं.२ ही शाळा नेहमीच अनेक उपक्रम राबवत असून अनेक उपक्रमात प्रावीण्य मिळवत आहे यात या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग आहे याचबरोबर यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षक वृंदांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचेही कौतुक अभिनंदन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांसह अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी श्री. म. ल. देसाई ( राज्य संयुक्त सरचिटणीस), जिल्हाध्यक्ष राजा कवीटकर, सचिव बाबाजी झेंडे, जिल्हा महीला सेल च्या सीमा पंडित, शीक्षक पतपेढी संचालक सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांसह माखोल धवडकी शाळेचे उपक्रमशील शिक्षक अरविंद सरनोबत सरांसह शाळेचे शिक्षक वृंद तसेच अखील भारतीय प्राथमिक संघ शाखा सावंतवाडी पदाधिकारी, उपस्थीत होते.











