खेड(प्रतिनिधी)७१ वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा बालेवाडी, बाणेर पुणे येथे १७ ते २० जुलै दरम्यान संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी जाणारा रत्नागिरी जिल्हा वरिष्ठ महिला संघाचे सराव शिबिर १० जुलै पासून सुरू झाले आहे १६ जुलै शिबिराची सांगता होणार आहे
खेड तालुका कबड्डी असोसिएशन खेड व काळकाई मंदिर विश्वस्त भरणे यांच्या संयुक्त विद्यमाने काळकाई मंदिर भरणे येथील प्रांगणात सुरू झालेल्या या सराव शिबिराचे उद्घाटन .१० जुलै रोजी ठीक . खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सतिश चिकणे व काळकाई मंदिर अध्यक्ष श्री.महेश जगदाळे व मंदिराचे सर्व विश्वस्त पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले






