अमित खोत | मालवण : भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने वायरी भूतनाथ शाळा व टिकम शाळा वायरी येथील विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. दरम्यान शिक्षक व विद्यार्थी यांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी देवानंद लोकेगांवकर, मिलिंद झाड, माजी उपसरपंच शाम झाड, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख केदार झाड, मुन्ना झाड, पांडुरंग मायनाक, गणेश सतार्डेकर, विकी लोकेगांवकर आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.












