खेड (प्रतिनिधी) जि प शाळा सात्विणगाव देऊळ तालुका खेड या शाळेची विद्यार्थिनी पायल पांडुरंग शिगवण हिने पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला
पायल हिला शाळेतील शिक्षिका अस्मिता पवार मुख्याध्यापिका शितल गोरीवले यांचे मार्गदर्शन लाभले पायलच्या या यशाबद्दल लवेल प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीधर शिगवण केंद्रप्रमुख संपदा पत्याणे व शाळा व्यवस्थापन समिती सात्विणगाव देऊळवाडी यांनी अभिनंदन केले








