8 लाखांच्या गुटख्याची वाहतुक करणार्‍या तिघांना न्यायालयाने शुक्रवारी 16 जुलै पर्यंत पोलिस कोठडी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील निवळी फाटा येथून बेकायदेशिरपणे तब्बल 8 लाखांच्या गुटख्याची वाहतुक करणार्‍या तिघांना न्यायालयाने शुक्रवारी 16 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गुटखा मालक संकेत शिवाजी चव्हाण (30,रा.फणसोप सडा,रत्नागिरी), चालक विशाल बळवंत घोरपडे (32,रा.फणसोप सडा,रत्नागिरी) आणि सुरज राजू साळुंखे (33, रा.धायरी,पूणे सध्या रा.फणसोप सडा,रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या करत 8 लाख 4 हजार रुपयांचा गुटखा 7 लाख 25 हजार रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.