बांदा (प्रतिनिधी) :
गोव्यातून आंबोलीच्या दिशेने लोखंड वाहतूक करणारा ट्रक बांदा महामार्गावर कट्टा कॉर्नर येथे मातीच्या भरावात रुतून अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात शनिवारी सकाळी झाला.
याठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून पूलाखालील रस्त्यांची कामे करण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अवजड वाहने मातीत रुतण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शनिवारी सकाळीच ट्रक रुतल्याने वाहतूक विस्कळीत झाली. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला.











